ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनसे १२२ जागा लढविण्याची शक्यता

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसे १२२ जागा लढविण्याची शक्यता

शहर : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही अखेर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असल्याचे दिसते. निवडणूक लढवावी की नाही, याबाबत मनसेतच दोन मतप्रवाह असल्याची चर्चा होती. परंतु आता मनसे 122 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे कळते. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा राज ठाकरेच करतील असे सांगण्यात आले.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्रित आणून ईव्हिएम विरोधात आंदोलन करण्याची घोषणाही केली होती. परंतु महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे ईव्हीएम विरोधातील आंदोलन बारगळल्याचे दिसते. याशिवाय निवडणूक आयोगही ईव्हीएम मतदानावर ठाम असल्याने आंदोलन करूनही उपयोग होणार नाही. यातच विधानसभेच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या सर्व विभाग अधिकार्‍यांची व नेत्यांची बैठक घेवून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत चाचपणी केली. तेव्हा एका गटाच्या मते निवडणूक लढवून जर उपयोग होणार नसेल तर कशाला निवडणूक लढवायची ? तर दूसरा गट निवडणुकीसाठी आग्रही आहे. कारण जर निवडणूक लढविली नाही तर पक्षाचा जनतेशी असलेला संपर्क तुटेल. कार्यकर्तेही नाराज होतील. त्यातून पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे मुद्दे उपस्थित केले गेल्याचे म्हटले जाते.

दरम्यान मनसे 100 जागा लढविणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. आता मात्र मनसेने 122 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यात मुंबईतील 36, ठाणे 24, नाशिक 15, मराठवाड्यात 42 पैकी 22 विदर्भात 62 पैकी 15, कोकणात 15 पैकी 10 जागांवर मनसेचे उमेदवार निवडणूक लढावतील. असे सांगण्यात आले. शिवसेना भाजपची युती झाल्यास दोन्ही पक्षातील नाराज पदाधिकारी मनसेकडे येतील, असा दावा मनसेच्या एका नेत्याने केला आहे.   

मागे

शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात
शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात

मुंबई लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्....

अधिक वाचा

पुढे  

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रातल्या 45-सातारा या लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक घेण्याचा का....

Read more