By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवणारे मात्र चर्चेत राहिलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेत जागा लढविली नाही मात्र विधानसभा निवडणुकीत 100 ते 125 जागा लढविणार आहे. त्याबद्दल नुकतीच पक्षाची बैठक पार पडली दोन दिवसात मनसे आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करुन 5 ऑक्टोबरला प्रचाराचा सुरुवात करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मनसेकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नव्हती. मागील आठवडय़ात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विभागीय अध्यक्षांची बैठक बोलावून विभागवार आढावा घेतला त्यानुसार मनसे राज्यात 100 ते 125 जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे समजते.
30 सप्टेंबर किंवा 1 ओकटोबरला मनसे आपल्या उमेदवारांची पहिली यादी तयार करणार . त्यानंतर 5 ऑक्टोबरला राज ठाकरे प्रचाराला सुरवात करणार असल्याचे सांगितले जाते आही. त्यामुळे राज ठाकरे स्व पक्षाच्या उमेदवारांसाठी कोणते मुद्दे मांडणार आहेत्त आणि काय भाषण करणार आहेत याकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे....
अधिक वाचा