By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमलबजावणी संचालयाने नोटिस बजावून त्यांची काळ साडे आठ तास चौकशी केल्यानंतर आज मनसेने ईडीला नोटिस पाठविली आहे. ईडीचा नामफलक इंग्लिश आणि हिन्दी मध्ये आहे. महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांचे नामफलक हे मराठी भाषेत असायला हवेत. त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकार्यांरकडे करून त्या नोटिसची प्रत ईडीला पाठविल्याचे मनसेने म्हटले आहे. शिवाय मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलक लावण्याची सक्ती करणार का ? असा प्रश्नही केला आहे. ईडीला नोटिस पाठविल्याची माहिती मनसेने ट्वीटर व्दारे दिली आहे.
सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिन्दी मध्ये 'प्रवर्तन निदेशालय' अस लिहिलं आहे. त्याखाली 'Enforcement Directorate' अस इंग्रजीत लिहिलं आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानला फायन....
अधिक वाचा