ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी काय आदेश देणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी काय आदेश देणार?

शहर : मुंबई

राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मनसेची (MNS) महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. साधारण सकाळी 10 वाजता राज ठाकरे वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल.

राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने नुकताच राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची झेड (z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासाठी वेळ पडल्यास स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी युती करण्याची रणनीती मनसेकडून आखली जात आहे.

मागे

….तर त्यांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घालावी : शेलार
….तर त्यांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घालावी : शेलार

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण....

अधिक वाचा