ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 08:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा

शहर : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी उघडपणे टीका केली आहे. मात्र, या प्रकरणावर मनसेने आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचं समर्थन असल्याचं उघड झालं आहे.

सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव नाही : संजय राऊत

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (13 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही उत्तर दिलं. “या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव कुठेही आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयात वकील कुणाचंही नाव घेऊ शकतात. तिथे 50 वकील उभे आहेत. मोठ्या लोकांची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळत नाही, संन्सनाटी निर्माण होत नाही, हे आता अलिकडच्या काळात समीकरण निर्माण झालं आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव कुणीही कुठेही घेतलेलं नाही, कोर्टात फक्त वृत्तपत्रांमधील काही बातम्यांचा संदर्भ दिला, असं मी ऐकलं”, अंस संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरेंकडूनही उत्तर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच उत्तर दिलं आहे. “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे”, अशी प्रतक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता.

मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

मागे

Navneet Rana Corona | खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला, लीलावतीत उपचार होणार
Navneet Rana Corona | खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला, लीलावतीत उपचार होणार

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईला रवाना ....

अधिक वाचा

पुढे  

सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण
सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असल....

Read more