By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर एकीकडे जागावाटपावरून पक्षाअंतर्गत होणारी बंडाळी सावरताना शिवसेनेने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. मनसे नेते नितीन नांदगावकर यांना शिवसेनेच्या गोटात घेतले आहे. नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत. नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून मनसेसाठी हा खूप मोठा धक्का आहे.
काल रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. नितीन नांदगावकर यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स खूप आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते मनसेसाठी स्टार प्रचारक ठरले असते. पण त्याआधीच शिवसेनेने त्यांना आपल्याकडे घेतले आहे. शिवसेनेत ते काय भुमिका निभावतात हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून जोरदार शक्तीप....
अधिक वाचा