By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
2019 ची विधानसभा निवडणूक ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेना यांच्या साठी अत्यंत महत्वाची बनली आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविन हा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द त्यांनी निवडणुकीच्या तयारीत उच्चारण्यासोबतच ठाकरे कुटुंबियाकडून पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील सदस्य आदित्य ठाकरे यांच्या रूपाने निवडणुकीत उतरले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या घोषणेनुसार ठाकरे कुटुंबिय एक जुटीने कामाला लागले आहेत की काय ? असा प्रश्न पडत आहे त्याच कारण शिवसेनेकडून वरळी विधानसभा मतदारसंघाकडून आदित्य ठाकरे यांना निवडणुकीत उभे करण्या आधी जय्यत तयारी केली होती त्यासाठी सचीन अहिर यांना शिवसेनेत घेण्यापासून ते वरळीत आदित्य ठाकरे उमेदवार म्हणून उभे राहणार की नाही इथ पर्यंत उत्सुकता ताणून ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारचे प्रयोग केले गेले शेवटी शेवटी काल त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली पाठोपाठ ईतर ही पक्षांनी आपल्या पक्षांचे उमेदवार जाहीर केले मात्र मनसेच्या यादीत वरळी साठी उमेदवारी जाहीर केली गेली नाही त्यामुळे पुतण्याच्या आणि घराण्याच्या विजयासाठी काका धावून गेलेत की काय अशा चर्चा केल्या जात आहेत. मनसेने काल पहिली यादी जाहीर केली त्यात 27 उमेदवारांची नावे जाहीर केली गेली. पण वरळी विधानसभेत मात्र उमेदवार जाहीर केला गेला नाही.
त्याचसोबत राष्ट्रवादी कडूनही ह्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार नसल्याचे कळत होते मात्र पवार कुटुंबियातील पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या उमेदवारामुळे पराभव झाल्याने शरद पवार यांच्यावर नाइलाजाने उमेदवार जाहीर करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
दरम्यान उद्या 3 ओक्टोंबरला आदित्य ठाकरे अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे कळत आहेत.
नारायण राणेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कधी ठरणार ? हा प्रचंड चर्चिलेला व....
अधिक वाचा