By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 10:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजभवनावर जाणार आहे. शेतकरी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
मनसे आज दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. या भेटीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी ते राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चार दिवसांपूर्वी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. ‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करण्यात यावा’, अशी मागणी फडणवीसांनी केली होती.
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याची विनंतीही फडणवीसांनी केली होती.
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी 18 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचितसा दिलासा दिला आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हातमिळवणी करत ‘महासेनाआघाडी’ स्थापन करुन सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी या तिन्ही पक्षांनी गेल्या शनिवारी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती. परंतु ही भेट तूर्तास लांबणीवर पडली. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे.
राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या महासे....
अधिक वाचा