ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी

शहर : देश

मोदी सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडल्यानंतर शुक्रवारी मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. मोदींच्या मंत्रिमंळात एकूण ५७ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्री आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, खातेवाटप जाहीर झाल्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम होती. अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली. हे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे. यानंतर हे सर्व मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारतील.

मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे

* पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग या खात्यांची जबाबदारी असेल. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असेल.

मंत्रिमंडळ वाटप (कॅबिनेट )

अमित शहा - गृहमंत्री

निर्मला सीतारमन - अर्थमंत्री

राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री

नरेंद्र सिंग तोमरकृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज

पीयुष गोयल - रेल्वे मंत्री

स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री

नितीन गडकरी - दळणवळण

प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण

रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी

रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण

संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री

सदानंद गौडा - रसायन आणि खते

हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग

तावरचंद गेहलोत - सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेन्ट

डॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्री

रमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकास

अर्जुन मुंडा - आदिवासी विभाग

डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धनविज्ञान आणि तंत्रज्ञान

धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील

मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक

प्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाण

डॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास

गिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध मत्स्यव्यवसाय

गजेंद्र शेखावत- जल शक्ती

राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यभार

संतोष कुमार गंगवार -कामगार आणि रोजगार

इंद्रजीत सिंह -सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

श्रीपाद नाईक -आयुर्वेद योगा; संरक्षण राज्यमंत्री

 डॉ. जितेंद्र सिंह - इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा

 किरण रिजिजू - युवा आणि खेळ

प्रल्हाद सिंह पटेल - सांस्कृतीक, पर्यटन

राजकुमार सिंह- उर्जा, नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा

हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण, नागरी विमानोड्डाण

मनसुख मांडवीय- जलवाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री

मागे

हातकणंगले ईव्हीएम मधून 459 मते जास्त, राजू शेट्टींची तक्रार
हातकणंगले ईव्हीएम मधून 459 मते जास्त, राजू शेट्टींची तक्रार

हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी य....

अधिक वाचा

पुढे  

‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत पूनम महाजन पिछाडीवर काँग्रेसला मताधिक्य
‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत पूनम महाजन पिछाडीवर काँग्रेसला मताधिक्य

भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून १ ला....

Read more