By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नुकताच भुतानचा दौरा करून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौर्यावर जाणार आहेत. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये पोहोचणार आहेत. 22 ते 27 ऑगस्ट या कालावधीत फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
23 ऑगस्टला पॅरिस येथील यूनेस्को भवनात ते भारतीय समुदायाला संबोधित करतील. फ्रान्सनंतर ते संयुक्त अरब अमीरातसाठी रवाना होतील. त्यानंतर मोदी बहारिनचा दौरा करतील. बहारिनचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. संयुक्त अरब अमीरात कडून सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ जायद" मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. युएईचे संस्थापक शेख जायद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान केला जातो. आखाती देशाच्या नेत्याच्या यांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा पुरस्कार मोदींना देण्यात येणार असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्र सरकारने 200 माजी खासदाराना सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडण्याचे आद....
अधिक वाचा