By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
संजय निरुपम हे मंगळवारी वाराणसीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार टीका केली. वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडून दिले, तो व्यक्ती औरंगजेब याचा आधुनिक अवतार आहे. वाराणसीत महामार्गासाठी शेकडो मंदिरं पाडण्यात आली. विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी 550 रुपये इतके शुल्क आकारले जाते. यावरुन एक स्पष्ट होते की जे औरंगजेब करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी करणे योग्यच आहे, असेही त्यांनी सांगितले. मी तर मोदींना औरंगजेब म्हणतो. रावण आणि दुर्योधन इतकाच अहंकार मोदींमध्ये देखील आहे. प्रियंका गांधी यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला की, दुर्योधन आणि रावणाचेही गर्वहरण झाले होते, मग मोदींच्या बाबतही हे शक्य आहे, असे सांगत निरुपम यांनी प्रियंका गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले.
माहिती अधिकाराअंतर्गत यूपीए सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झालेच नव्हते, अशी माहिती समोर आली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता संजय निरुपम संतापले. भाजपाने हा खोटा प्रचार केला असून यूपीए सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राइकबाबत सैन्यातील अधिकार्यांनीही दुजोरा दिला आहे, असा दावा त्यांनी केला.
प्रियंका गांधींनी अंबालामधील सभेत पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा द....
अधिक वाचा