ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जाहिरात तज्ज्ञांना जमले नाही 'ते' मोदींनी करुन दाखवले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 01:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जाहिरात तज्ज्ञांना जमले नाही 'ते' मोदींनी करुन दाखवले

शहर : देश

भाजपच्या प्रचारातील 'मै भी चौकीदार हूं' आणि 'मोदी है, तो मुमकिन है' या दोन घोषणा सध्या चांगल्याच गाजत आहेत. या घोषणांमुळे झालेल्या वातावरणनिर्मिचा फायदाही भाजपला होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हाच फॅक्टर भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे या आकर्षक घोषणांचा निर्माता नक्की कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका लेखातून याचा खुलासा झाला आहे. त्यानुसार भाजपने निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहिरात तज्ज्ञांची फौज कामाला लावली आहे. मात्र, त्यांच्या जाहिराती किंवा घोषवाक्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भाजपच्या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा भाजपच्या मदतीला धावून आले. मोदींनी जाहिरात तज्ज्ञांच्या घोषवाक्यात काही बदल सुचवले आणि त्याला चांगलेच यश मिळाले. 

जाहिरात तज्ज्ञांकडून प्रचारासाठी सुरुवातीला 'नामुमकिन अब मुमकिन है', असे घोषवाक्य तयार करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींचे नाव नसल्यामुळे या घोषणेला तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका प्रचारसभेत मोदींनी थोडासा बदल करून ही घोषणा नव्याने लोकांसमोर आणली. पूर्वीच्या घोषणेपेक्षा त्यांची 'मोदी है, तो मुमकिन है', ही घोषणा अधिक लोकप्रिय ठरली. 

मात्र, यानंतरही भाजपच्या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. काँग्रेसची 'चौकीदार चोर है' ही घोषणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा मोदींनी 'मै भी चौकीदार हूं' असा नारा देत काँग्रेसला शह दिला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापूर्वी 'चौकीदार' असा शब्द लावून या घोषणेची आणखी वातावरणनिर्मिती केली. सोशल मीडियावर या मोहिमेला चांगलेच यश मिळाले. 

२०१४ च्या निवडणुकीतही काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदींना चायवाला म्हणून हिणवले होते. मात्र, मोदींनी चायवाला हाच शब्द वापरून प्रचारमोहीम सुरु केली होती. त्यामुळे भाजपच्या संपूर्ण प्रचाराचा रोख बदलला होता. 

मागे

शिर्डीत तिरंगी लढत,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
शिर्डीत तिरंगी लढत,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसने भाऊसाहेब क....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीची राज्याची यादी भाजपने जाहीर केली. मात्र, भाजपच्या मित्र प....

Read more