By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 17, 2021 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवर अत्यंत अर्वाच्च भाषेत ही धमकी देण्यात आली आहे. त्यांना जिवे मारण्याचाही या निनावी पत्रात उल्लेख आहे. याबाबत खासदार राणा यांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हाही दाखल झाला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. राणा यांनी याबाबत शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.
सोशल मीडियावर एफआयआर कॉपी देखील व्हायरल होत आहे. 13 फेब्रुवारी 2021 रोजी ही तक्रार करण्यात आली आहे. यात खासदार राणा यांनी म्हटलं आहे की, 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेना पक्षाच्या लेटरहेडवर निनावी पत्राद्वारे, आठ दिवसांत मी माफी मागितली नाही तर मला व माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.'
एफआयआरमध्ये खासदार राणा यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत. लोकशाहीसाठी असे शब्द मुळीच चांगले नाहीत. मला अश्लील शब्द वापरुन धमकी देणारे फोन कॉल देखील केले जात आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्या....
अधिक वाचा