ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांची संसदेत माफी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांची संसदेत माफी

शहर : देश

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांनी लोकसभेत माफी मागितली आहे. आपण केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. माझ्या या वक्तव्यामुळे कोणाला ठेस पोहचली असेल तर माफी मागते. पण संसदेत माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. हे निंदनीय आहे. महात्मा गांधींनी देशासाठी केलेल्या कामाचा मला आदर आहे. याच संसदेतील एका सदस्याने मला सार्वजनिकपणे दहशतवादी म्हटलं होतं. माझ्या विरोधात कोर्टात कोणताच आरोप सिद्ध झाला नाही. तरी देखील माझा अपमान केला गेला.

काय आहे प्रकरण?

लोकसभेत एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना डीएमकेचे खासदार . राजा यांनी गोडसेचं उदाहरण देत त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली असं सांगत असताना साध्वी यांनी त्यांना तुम्ही एका देशभक्ताचं उदाहरण नाही देऊ शकत असं म्हटलं होतं. साध्वी प्रज्ञाच्या विधानावर विरोधकांनी त्यांचावर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील ट्विट करत पंतप्रधानांपुढे प्रश्न उपस्थित केले.

निवडणुकीच्या दरम्यान ही नाथूराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे पंतप्रधान मोदींनी यावर नाराजी दर्शवली होती. साध्वी प्रज्ञा यांनी तेव्हा माफी मागितली होती. पण पंतप्रधान मोदींनी त्यांना मनातून कधीच माफ नाही करु शकत असं म्हटलं होतं.

 

मागे

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादीचे दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादीचे दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांची अखेर विधानसभेच्या हंगामी अध्यक....

Read more