By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 04, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये दोन नगरसेवकपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. येत्या ६ मे अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे या गावांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. समाविष्ट गावांमध्ये आचारसंहिता सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या गावांतील विविध प्रश्ना संदर्भात सोमवारी (दि.३) रोजी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह महापालिकेचे इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन जागांसाठी इच्छुक असलेले काही उमेदवार देखील बैठकीला उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध महापालिकांमधील पोटनिवडणुकासह पुणे महापालिकेच्या प्रभाग ४२-अ आणि ४२-ब या या समाविष्ट गावांतून दोन नगरसेवक पदाची देखील निवडणूक जाहिर केली आहे. आयोगाने २४ जून रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, तेव्हा पासून या गावांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये ३० जून ते ६ मे अखेर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. या दोन जागांसाठी २३ मे रोजी मतदान होणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये आचारसंहिता सुरु असताना सोमवार (दि.३) रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मिळकत कराच्या अडचणी, रस्ते, ड्रेनेजचे प्रश्ना संदर्भांत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर याच्यासह अनेक अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शहर अध्यक्ष चेंतन तुपे, नगरसेवक सायली वांजळे, सचिन दोडके यांच्यासह समाविष्ट गावांमधील इच्छुक उमेदवार देखील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी समाविष्ट गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतही सुविधा उपलब्ध नाही, अनेक गावांमध्ये महापालिकेच्या पाण्याची साधी पाईपलाईन देखील टाकलेली नाही तरी देखील १७०० रुपयांची पाणी पट्टी लावली आहे, रस्ते, ड्रेनेज कोणत्याही सुविधा देत नसताना दोन वर्षांपासून टॅक्स वसुल करत आहे, कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिला जात नसतान टँक्स, पाणी पट्टी का द्यायची असा सवाल उपस्थित देखील उपस्थित केले. गावांच्या पिण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी देखील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केली.
महापालिका अधिकाऱ्यांची सारवासारव
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आचारसंहित लागू झाली असताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत गावांच्या विविध प्रश्नावर चर्चा देखील करण्यात आली. याबाबत महापालिकेचे निवडणूक अधिकारी संतोष भोर यांना विचारले असता त्यांनी सुळे यांनी निवडणुका जाहीर झालेली गावे सोडून अन्य प्रश्नावर बैठक घेतल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्ज....
अधिक वाचा