ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोनशे माजी खासदाराना सरकारी निवासस्थाने सोडण्याचा आदेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दोनशे माजी खासदाराना सरकारी निवासस्थाने सोडण्याचा आदेश

शहर : delhi

केंद्र सरकारने 200 माजी खासदाराना सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय निवासस्थान न सोडल्यास येथील वीज आणि पाण्याची जोडणी कापण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

सात दिवसांची मुदत उलटून गेल्यास पुढच्या तीन दिवसात वीज आणि पाण्याची जोडणी कापण्याचे आदेश दिल्याची माहिती हाऊसिंग कमिटीचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी दिली. 16 व्या लोकसभेची मुदत संपून दोन महिने उलटल्यानंतरही दोनशेहून अधिक माजी खासदारांनी राजधानी दिल्लीतील आपले सरकारी बंगले रिक्त केलेले नाहीत.

नव्या खासदारांना होणार्‍या त्रासाबद्दल नरेंद्र मोदींच्यावतीने पंतप्रधान कार्यालयाकडून ही सोमवारी संध्याकाळी ट्विटरवरून माजी खासदारांना कान पिचक्या देण्यात आल्या आहेत.

मागे

डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध
डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध विरोध

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौर्‍यावर
पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौर्‍यावर

नुकताच भुतानचा दौरा करून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, बहारीन आणि ....

Read more