By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 06:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50 जणांवर 5 दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सहकारी बँकेचा हा घोटाळा 25 हजार कोटीचा आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नावांचा यात समावेश आहे. सूरीदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियम बाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियम बाहयपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले.या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त , कँग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करीत एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्याची विनती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेव्दारे केली होती. याविषयी उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती.त्यामुळे हायकोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते. त्यानंतर न्या.सत्यरंजन धर्माधिकारी व न्या.संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने 31 जुलै रोजी याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. आज तो जाहीर करताना खंडपीठाने याचिकादारांची विनती मान्य करीत पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परीषदेच्या निवडणुकीत शिव....
अधिक वाचा