ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुठे आहेत खड्डे ? मुंबईत खड्डे अंह.

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुठे आहेत खड्डे ? मुंबईत खड्डे अंह.

शहर : मुंबई

मुंबईतील रस्ते आणि त्यापाठोपाठ त्यातील खड्डे हा विषय आजरोजीचा नाही. मात्र भरपावसात मुंबई भरल्यावरही जशी मुंबईत पाणी भरलेच नाही अशी एक राजकीय आशावादी दृष्टी लागते त्या दृष्टीचा अजून एक नमूना पुन्हा एकदा दिसून आला. आणि हा नमूना दाखवला आहे. पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांनी. "मी मुंबईच्या रस्त्यांवरुन रोज प्रवास करतो. मी मुंबईच्या रस्त्यांवर आजपर्यंत एकही खड्डा पाहिलेला नाही"असे विधान यशवंत जाधव यांनी केले आहे. काही खड्डे असले तर ते केवळ मेट्रोच्या कामांमुळे असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

‘मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तुम्ही मला एखादा तरी खड्डा दाखवाच. माझ्यासारख्या रोज प्रवास करणाऱ्याला एकही खड्डा दिसलेला नाही. जर मुंबईच्या रस्त्यावर काही खड्डे असतील तर ते मेट्रोचे बांधकाम सुरु असल्याने झाले आहेत. पण मी खात्रीने सांगू शकतो की मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत,’ असं जाधव यांनी म्हटलं आहे. मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे नाही असा दावा करण्याबरोबरच कोणत्याही मुंबईकराला रस्त्यावर खड्डा दिसल्यास तो केवळ दोन तासांमध्ये बुजवला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी खड्ड्यांना इतक्या तत्पर बुजवणार्‍या पालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकार्‍यांची गुणगानच गायल पाहिजे असे वाटते.

या वर्षी मुंबईत 7 बळी रस्त्यावरील खड्ड्यांच्यामुळे झाले आहेत आणि इतर किरकोळ नोंद न झालेले अपघात होतच असतात त्यात होणारे जखमी ह्यांची संख्या वेगळी आहे.

नुकताच माहितीच्या अधिकाराखाली मुंबईतील खड्ड्याची माहिती मागविली गेली होती. त्यात मुंबईतील एका खड्ड्याला 2 लाखाहून अधिक खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता सभापतींचे म्हणणेही खोट आहे असे म्हणता येत नाही असच म्हणावे लागेल कारण एका खड्ड्याला 2 लाखाहून अधिक खर्च करणार्‍या महापालिकेच्या रस्त्यांवर खड्डे असू तरी कसे शकतील हा ही एक मुद्दा असू शकेलच. मुंबईच्या ह्या 'वर्ल्ड रेकॉर्ड' असलेल्या खड्ड्यांची बातच वेगळी तशीच पदाधिकार्‍यांचीही.

 

मागे

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १ कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी
चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १ कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी हर्ब....

अधिक वाचा

पुढे  

चंद्राबाबू नायडू नजरकैदेत
चंद्राबाबू नायडू नजरकैदेत

आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ....

Read more