By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदार संघात सकल मराठा समाज बांधवांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भांडुप येथे पत्रकार परिषद घेवून मराठा समाज आणि आगरी कोळी बांधव यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजांचे बळ मिळणार आहे. मराठा समाजाची वस्ती मोठया प्रमाणात घाटकोपर भटवडी ,भांडुप, काजूरमार्ग,विक्रोळी पार्क साईट येथे आणि आगरी कोळी बांधव यांचे वस्ती, भांडुप, कंजूरमार्ग, नाहूर गाव, मुलुंड पूर्व येथे असल्याने आघाडीच्या उमेदवारास बळ मिळणार आहे. भांडुप पश्चिम येथील बँकेट हॉल येथे दोन्ही समाजाच्या स्थानिक नागरिकांनी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांना लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार असल्याचे पत्रक दिलं आहे. यावेळी मराठा युवा मोर्चाचे समन्वयक बिपीन विचारे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या हक्कासाठी तरुणांनी मागील वर्षी जे लाखोंचे मोर्चे राज्यभर काढले, त्या पैकी एक मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. तेव्हा संजय दीना पाटील यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तसेच न्यायालयात मोर्चामधील मुलांना जामीन मंजूर करण्यासाठी सहकार्य केले. हा एकच हेतू ठेवून आम्ही ईशान्य मुंबईत संजय पाटील यांच्यासोबत आहोत. यावेळी दुसरे समन्वयक संपतराव सूर्यवंशी म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवार ईशान्य मुंबईतून नेहा कुऱ्हाडे निवडणुकीसाठी जरी उभ्या असल्या तरी संजय पाटील यांना आमचा पाठिंबा असणार आहे. आमचे राज्यातील कोणत्याही पक्षासोबत मतभेद नाहीत. त्यामुळे आम्ही केवळ ईशान्य मुंबईतील संजय पाटील यांना पाठिंबा देत आहोत. दरम्यान, यावेळी आगरी कोळी बांधव यांच्या तर्फे भारदाज चौधरी यांनी पाठिंबा देत संजय पाटील यांच्याकडे त्यांच्या मागण्या पुर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.
मुंबईतील सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच....
अधिक वाचा