By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुरु असताना, तिकडे महापालिकेतील महापौर निवडणुकीत रंगत आली आहे. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौरपदाची शर्यत सुरु झाली आहे. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.
आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
असं असलं तरी 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावाही खासदार मनोज कोटक यांनी केला.
मुंबई महापालिकेत महापौर निवडणुकीत सेनेला धक्का देणार अशी चर्चा होती. पण आता या निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
राज्यात अजून शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत समीकरण जुळलेलं नाही. त्यामुळे भाजपची वेट अँड वॉचची भूमिका कायम आहे.
शिवसेनेकडून महापौरपदासाठी सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण ‘मातोश्री’ नेहमी ऐनवेळी नाव बदलत असते, त्यामुळे जोपर्यंत नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत नाव निश्चित मानलं जात नाही.
काँग्रेस उमेदवार देणार?
एकीकडे भाजपने उमेदवार देण्यास नकार दिला असला, तरी दुसरीकडे शिवसेनेचा नवा मित्रपक्ष काँग्रेसने मात्र उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची दाट शक्यता आहे. महासेनाआघाडीच्या चर्चा सुरु असल्या तरी मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधीपक्षाच्या भूमिकेतच राहणार आहे. दुपारी 3 वा. महापालिकेत सर्व काँग्रेस नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे. विरोधीपक्षाची भूमिका म्हणून काँग्रेस आपला अर्ज दाखल करणार आहे. मात्र, दिल्ली हायकमांडने आदेश दिल्यास काँग्रेस दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे देखील घेऊ शकते.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे व....
अधिक वाचा