By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महापालिका आयुक्तानी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. त्यानुसार वाहन तळाच्या 500 मी. पर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढल्यास 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे. तथापि , या नव्या पार्किंग पॉलिसीच खुद्द महापौरांनीच उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. विलेपार्ले येथील मालवणी आस्वाद होटेलाबाहेर नोपार्किंग झोन मध्ये महापौर महाडेश्वर यांची गाडी पार्क केलेली होती. परंतु त्यांच्या वर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. नव्या पार्किंग पॉलिसी नुसार महापौरांच्या गाडीलाही 10 हजार रूपयांचा दंड होऊ शकतो.
दरम्यान, नो पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क केली नव्हती तर उतरण्यासाठी गाडी तेथे थांबविली होती. त्यामुळे नियमांच उल्लंघन झालं आस म्हणता येनार नाही, मात्र पावती आल्यास दंडाची रक्कम भरू. असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले
हिमाचल प्रदेश चे नवे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतीनी आज कलराज मिश्र यांची निय....
अधिक वाचा