By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात मागील ६ तासापासून फक्त २९ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत राज्यात २९ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र मतदान करताना पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला आहे. आज सकाळी पहिल्या टप्प्यात म्हणजे सकाळी ७ ते ९ हा दोन तासात राज्यात ५ टक्के मतदान झालं होतं.बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळामधील काही घटना सोडल्या, तर राज्यात मतदान सर्वत्र शांततेत सुरू आहे. दुपारनंतर काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.यात मुंबईत दुपारी १ पर्यंत फक्त २५ टक्के मतदान झालं आहे. राज्याच्या सरासरी मतदानाच्या मानाने ही टक्केवारी ४ टक्के कमी आहे.
182-वरळी विधान सभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बं....
अधिक वाचा