By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईत हिसंक वळण लागले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी (टीस) या आंदोलनात सहभागी झाले असून रविवारी सायंकाळी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून आंदोलन केले आहे. या आंदोलनात त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे.
सुरूवातीला या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबची झाली. मात्र नंतर अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे सरकत असून ते आता चेंबुरच्या दिशेने चालले आहे. दरम्यान, काल दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणा-या ५० विद्यार्थ्यांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना सोमवारी पहाटे सोडण्यात आले. त्यातील ३५ जणांना कालकाजी पोलीस ठाणे, उर्वरित एकाला न्यू फ्रेंड्स कॉलनीमधून सोडण्यात आले. दिल्लीतील हिंसाचारानंतर दिल्ली मेट्रोने ११ स्टेशनांवर मेट्रो सेवा बंद केली आहे. तर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई – शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघ....
अधिक वाचा