ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल

शहर : देश

उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून जाण्याची भीती सतावते आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बुलंदशहरमधील या गावात राहणाऱ्या मुस्लिमांच्या मते, गावात हिंदू-मुस्लिम एकमेकांशी बोलत देखील नाहीत. पहिल्यांदा अशी परिस्थिती नव्हती. मुस्लिम मुलंही हिंदूंच्या मुलांशी खेळायचे. परंतु आता मुस्लिम घाबरलेले असून, त्यांच्यामते 2 वर्षांत दोन्ही समाजांत मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. रॉयटर्सशी बोलताना गावातल्या मुस्लिम व्यक्तीनं सांगितलं की, जर भाजपा पुन्हा जिंकला आणि मोदी पंतप्रधान झाले, तर हा दोन्ही समाजातील तणाव पराकोटीला जाऊ शकतो.गावात छोटंसं दुकान असलेले गुलफाम अली म्हणाले, पहिल्यांदा परिस्थिती चांगली होती. मुस्लिम-हिंदू सलोख्यानं राहत होते. वाईट काळातही एकमेकांसोबत असायचे. पण मोदी आणि योगींनी सर्वच परिस्थिती बिघडवून टाकली आहे. आम्हाला ही जागा सोडायची आहेमात्र आम्ही असं करू शकत नाही. अली सांगतात, जवळपास एक डझन मुस्लिम कुटुंबांनी गेल्या दोन वर्षांत गाव सोडलं. भाजपानं या गावात अशी काही परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे. गेल्या वर्षी बुलंदशहरमधल्या याच भागात काही हिंदूंनी तक्रारी केल्या होत्या की, त्यांनी मुस्लिमांना गायीला कापताना पाहिलं होतं. त्यानंतर जमावानं एका पोलीस अधिकाऱ्यांचीही हत्या केली होती. 4 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नयाबांस गावात जवळपास 400 मुस्लिम राहतात. परंतु 5 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसेच्या छायेतून गाव अद्याप बाहेर आलेलं नाही.

मागे

विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवार नीती पुन्हा सक्रीय

लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास शिल्लक आहेत. एक्झिट पोलनुसार ए....

अधिक वाचा

पुढे  

ईव्हीएममध्ये फेरफार शक्य नाही, मात्र अशी यंत्रणा बसवलीय का? - पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी देशातील जवळप....

Read more