ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापौरांच्या गाडीवर गोळीबार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 12:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापौरांच्या गाडीवर गोळीबार

शहर : नागपूर

                   नागपूर- नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महापौर जोशी थोडक्यात बचावले. या हल्लेखोरांनी महापौर जोशी यांच्यावर एकूण ४ गोळ्या झाडून ते पसार झाले. ही घटना अमरावती आउटर रिग रोडवर घडली असून हल्ल्याच्या वेळी महापौर स्वत: गाडी चालवत होते. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

             महापौर संदीप जोशी यांनी काल वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित कोला होता. हा कार्यक्रम आटोपून ते सुमारे १२ वाजण्याच्या सुमाराला आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते.


              दरम्यान, त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.

                 हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र सुदैवाने त्याना कोणतीही ईजा झाली नाही.
 

मागे

पायल रोहतगीचा जामीन मंजूर
पायल रोहतगीचा जामीन मंजूर

            नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी न्यायालयाने २४ डिसेंबर अभि....

अधिक वाचा

पुढे  

 एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

          नागपुर - भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे हे मोठा राजकीय नि....

Read more