ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नमिता मुंदडा भाजपावासी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 02:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नमिता मुंदडा भाजपावासी

शहर : बीड

शरद पवार यांच्या इडीच्या नाटयांनतर आणि अजित पवार यांच्या राजीनामा नंतर पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी  पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि  भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र, आता अचानक त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवडय़ात शरद पवार यांनी बीड जिह्यातून पाच उमेदवारांची घोषणा केली होती.

नमिता मुंदडा या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती.

मागे

मनसेचा 5 ऑक्टोबरला प्रचाराचा मुहूर्त
मनसेचा 5 ऑक्टोबरला प्रचाराचा मुहूर्त

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवणारे मात्र चर्चेत राहिलेला पक्ष म्हणजे  म....

अधिक वाचा

पुढे  

आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर
आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर

शेतकरी कागार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्ह....

Read more