ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक संपताच नमो टीव्ही बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 21, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक संपताच नमो टीव्ही बंद

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आणि अन्य संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नमो टीव्हीने (NAMO Tv)लोकसभा निवडणूक संपताच आपला गाशा गुंडाळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर १७ मे रोजीच नमो टीव्ही बंद झाला होता. लोकसभा निवडणुकीला काही दिवस असताना ३१ मार्चपासून हे चॅनल सुरु झाले होते. तेव्हापासून हे चॅनल वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

विरोधकांनी या चॅनलसंदर्भात अनेक आक्षेप घेतले होते. यानंतर निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात नमो टीव्हीवर मतदानाच्या ४८ तास आधी रेकॉर्डेड शो दाखवण्यास मनाई केली होती. परंतु, यादरम्यान कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, तरीही विरोधकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत नमो टीव्ही बंद करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर निवडणूक आयोगाकडून माहिती आणि प्रसारण खात्याला नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, याबाबत निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून निवडणुकीच्या प्रचारासाठीच नमो टीव्ही सुरु करण्यात आला होता. आता प्रचार संपल्यानंतर त्याची काही गरज उरलेली नाही. त्यामुळे १७ मे रोजी हे चॅनेल बंद करण्यात आल्याचे या नेत्याने सांगितले. हे चॅनल भाजप पुरस्कृत असल्याचा दावाही विरोधकांनी केला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी हा दावा फेटाळून लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत मी स्वत: नमो टीव्ही बघत नसल्याचे सांगितले होते. मात्र, हे चॅनल सुरु झाले त्यादिवशीच मोदींनी ट्विट करून या चॅनलवर 'मै भी चौकीदार' हा कार्यक्रम बघण्याचे आवाहन केले होते.

मागे

एक्झिट पोल ही नौटंकी आहे,पोलनंतर काल  पासून मला फोन येतायत- शरद पवार
एक्झिट पोल ही नौटंकी आहे,पोलनंतर काल पासून मला फोन येतायत- शरद पवार

एक्झिट पोल ही नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख शरद पवार या....

अधिक वाचा

पुढे  

एक्झिट पोलच्या निकालांवरून देशात आणखी एका बालाकोटची तयारी केली जातेय- मेहबुबा मुफ्ती
एक्झिट पोलच्या निकालांवरून देशात आणखी एका बालाकोटची तयारी केली जातेय- मेहबुबा मुफ्ती

एक्झिट पोलच्या निकालांवरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु असताना आता या ....

Read more