By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवट लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. 'सरकार आम्हीच स्थापन करु आणि ज्यावेळी राज्यपालांकडे जाऊ त्यावेळी १४५ आकड्यांसह राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू', असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडून सत्तास्थापन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. साम, दाम, दंड, भेद शिवसेनेनेच शिकवला असल्याचं ते यावेळी म्हणाले. नारायण राणे यांनी भाजप १४५ संख्याबळाचा दावा करणार आहे, असं म्हटलं असलं, तरी ते हा आकडा कसा जमवणार आहेत ते प्रश्नचिन्ह आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याला त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.
नारायण राणे यांच्या वक्तव्यांपूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आम्हाला वेळ हवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरु आहे, असं म्हटलं आहे.
आम्ही राज्यपालांकडे सरकार स्थापनेची इच्छा व्यक्त केली, मात्र त्यांनी वेळ दिला नाही. शिवसेनेला काही वेळ हवा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी २४ तासांची वेळ पुरेशी नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची एक संयुक्त बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार....
अधिक वाचा