ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राणेंचा 'स्वाभिमान' लवकरच भाजपमध्ये ...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राणेंचा 'स्वाभिमान' लवकरच भाजपमध्ये ...

शहर : मुंबई

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे. राणे कुटुंबाचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता. आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

भाजप शिवसेनेची युती झाली असली तरीही कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. गेली 24 वर्ष ते नारायण राणेंचे सहकारी होते. मात्र नितेश राणे यांच्या कामाच्या पद्धतीमुळेच आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राणेंचा आपल्यावर विश्वास राहिला नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

 

 

मागे

कुणाची माय व्याली तरी नाणार पुन्हा होऊ देणार नाही -शिवसेना
कुणाची माय व्याली तरी नाणार पुन्हा होऊ देणार नाही -शिवसेना

नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने य....

अधिक वाचा

पुढे  

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी  राजकीय पक्षांची कोट्यवधींची उधळण
निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्षांची कोट्यवधींची उधळण

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यता येणारी जाहीरातबाजी, प्रचा....

Read more