By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीतील भव्यदिव्य विजयानंतर गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या पर्वाला प्रारंभ होईल. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांचा हा शपथविधी सोहळा पार पडेल. यावेळी मोदींसोबत भाजप आणि अन्य घटकपक्षांतील काही खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल. त्यामुळे आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कालपासून अनेक खासदारांची नावे प्रचंड चर्चेत होती.
मात्र, आता आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अंतिम यादी समोर आली आहे. यापैकी बहुतांश मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करून कळवण्यात आले आहे. यावरून आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ६० ते ७० खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. प्रत्येक घटकपक्षाला एक-एक मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, शेवटच्या क्षणी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेना आणि जदयूला प्रत्येकी दोन, तर अकाली दल, लोक जनशक्ती पक्ष आणि अण्णाद्रमुकच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद येऊ शकते. आज शपथ घेणारे मंत्री दुपारी साडेचार वाजत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे
1. अजुर्नराम मेघवाल
2. जितेंद्र सिंह
3. रामदास आठवले
4. किशन रेड्डी
5. राम विलास पासवान
6. सुरेश अंगड़ी
7. पीयूष गोयल
8. प्रह्लाद जोशी
9. मुख्तार अब्बास नकवी
10. धर्मेंद्र प्रधान
11. हरसिमरत कौर
12. बाबुल सुप्रियो
13. सुषमा स्वराज
14. स्मृती ईरानी
15. निर्मला सीतारमण
16. प्रकाश जावड़ेकर
17. रविशंकर प्रसाद
18. रमेश पोखरियाल निशंक
19. प्रल्हाद पटेल
20. कैलाश चौधरी
21. थावरचंद गहलोत
22. किशन पाल गुर्जर
23. साध्वी निरंजन ज्योति
24. किरन रिजिजु
25. नरेंद्र तोमर
26. सदानंद गौड़ा
27. आरसीपी सिंह (जनता दल यूनाइटेड)
28. पुरुषोत्तम रुपाला
29. गजेंद्र शेखावत
30. अनुप्रिया पटेल
31. राव इंद्रजीत
32. संजीव बालियान
33. अरविंद सावंत
महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल ....
अधिक वाचा