ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात - पवार

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 02:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात - पवार

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, अशी टीका शरद पवारांनी केली. मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवगाव येथे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवारी संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत पवार यांनी मोदी आणि भाजप सरकारचा चांगलाच समचार घेतला. 
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थित करण्यात आला. या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यासभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केल. मोदी माझं बोट धरून राजकारण करत असल्याचं सांगतात मात्र मोदी कुठलेही निर्णय घेतात आणि परत माझं बोट धरतात, असे सांगत मोदी सरकारने अनेक योजना आणल्या. मात्र योजनांचा पैसा जाहिरातीवर खर्च केला, असा टोलाही पवार यांनी मोदींना लगावला. 

मागे

उत्तर हिंदुस्थानी नेत्यांनी महायुतीला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे,
उत्तर हिंदुस्थानी नेत्यांनी महायुतीला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे,

उत्तर हिंदुस्थानी समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शि....

अधिक वाचा

पुढे  

loksabha election  : हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल
loksabha election : हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनय क्षेत्राकडून राजकारणाकड....

Read more