ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी

शहर : देश

जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मताधिकार बजावल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, ''ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल असा मला विश्वास आहे.'' 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले होते. मोदींना संताप अनावर झाल्याने ते माझे वडील, आजी व आजोबांवर टीका करतात. ते मत्सर पसरवितात. मात्र मी त्यांना प्रेमालिंगन देऊन प्रेमाचा प्रसार करतो, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. 

 

मागे

भाषणांमध्ये अली आणि बजरंग बली ही वेळेची गरज- योगी आदित्यनाथ
भाषणांमध्ये अली आणि बजरंग बली ही वेळेची गरज- योगी आदित्यनाथ

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ आहे. सहाव्या टप्प्....

अधिक वाचा

पुढे  

बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या
बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या

तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लो....

Read more