ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 23, 2024 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत

शहर : नाशिक

शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन पार पडतंय. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत बोलत आहेत. शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. त्यात उध्दव ठाकरे यांनी ज्योत पेटवली आहे. श्रीरामासोबत शिवसेनेचं जुनं नातं आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

 

शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली. लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. आम्ही काय कुणाचे खातो, जे आम्हाला देतो. हे धर्मक्षेत्र आहे.लढाई आपण कुरुक्षेत्रातून सुरू करणार आहोत, असं संजय राऊत यांनी या महाअधिवेशनात म्हणाले.

ठाकरे गटाचं महाअधिवेशन

नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित आहेत.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे इतरही नेते मंचावर उपस्थित आहे. या अधिवेशनात सध्या संजय राऊत बोलत आहेत. अधिवेशनानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेकडे राज्याचं लक्ष आहे.

मागे

अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा
अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण अयोध्या उज....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या,राम मंदिर आणि बाबरी मशीद...काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका?
अयोध्या,राम मंदिर आणि बाबरी मशीद...काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. कालच अयोध्येत....

Read more