By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2020 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.
बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आलाय. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता शिवसेना भवन इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. त्यामुळे सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपची डोकेदुखी वाढली!
बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात ती पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता. मात्र, त्यानंतरही सोमवारी मुंबईत सानप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर आता नाशिक भाजपात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा गृहकलह निर्माण होण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत.
सानपांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं : चंद्रकांत पाटील
एका विचार आणि ध्येयाने झपाटलेली माणसं फार काळ दूर राहू शकत नाहीत. एका घटनेमुळे बाळासाहेब सानप दूर गेले. पण त्यांच्या मनात अस्वस्थता होती. पुन्हा इथेच जायचं आहे, हे त्यांना माहिती होतं. पण आता गैरसमज दूर झाले आहेत. या काळात ना कुणी पक्षाबाहेर गेलं, ना कुणाचा उत्साह कमी झाला. बाळासाहेब हे राज्याच्या पातळीवरील नेते असल्याने त्यांना चांगली जबाबदारी दोन तीन दिवसात जाहीर करेन. नाशिक महापालिकेसोबतच देवयानी फरांदे, जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्या साथीने सानप यांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
लाव रे तो व्हिडीओ म्हणत लोकसभा निवडणूक गाजवणारे राज ठाकरे आता ग्रामपंचायत ....
अधिक वाचा