By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमिताने नाशिकमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात अनेक पदाधिकारी यांचे मोबाइल आणि रोख रक्कम लंपास करणार्या बिलाल खान आणि विठ्ठल जाधव यांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. यातील बिलाल हा मालेगावचा असून विठ्ठल बीडचा आहे.
मेळाव्यातील गर्दीचा फायदा घेत चोर आपल्या खिशातील पैसे चोरत असल्याचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातार यांच्या लक्षात आले. तात्काल दातार यांनी चोराला रंगेहात पकडून अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले . त्यानंतर आणखी 4-5 जणांचे मोबाइल व रोख रक्कम गेल्याचे उघडकीस आले तर आपले 26 हजार रुपये चोरानी लांबविल्याची तक्रार रामदास अहिरे या पदाधिकार्याने केली आहे.
राहुल गांधी यांनी कॉंग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काही दिवस उलटू....
अधिक वाचा