ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 

शहर : bhopal

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा बरळल्या आहेत. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे याला हिंदू दहशतवादी म्हटले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला हिंदू दहशतवादी म्हणणार्‍यांनी स्वत:ला निरखून पहावे. अशा लोकांना या निवडणुकीत उत्तर मिळेल.
कमल हसन यांनी एका सभेत बोलताना त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या चर्चेमध्येच नव्या मुद्द्याला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट करत कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आता याच मुद्यावरुन प्रज्ञा सिंह बरळल्या आहेत.

मागे

आरोप सिद्ध न झाल्यास मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? ममता बॅनर्जी
आरोप सिद्ध न झाल्यास मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? ममता बॅनर्जी

निवडणुकीचा फक्त एक टप्पा बाकी आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पश्च....

अधिक वाचा

पुढे  

'मक्कल निधी मैयम'च्या सभेत अंडे-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हसन यांचं प्रत्यूत्तर
'मक्कल निधी मैयम'च्या सभेत अंडे-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हसन यांचं प्रत्यूत्तर

कमल हसनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'मक्कल निधी मैयम'च्या ए....

Read more