By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. यावरुन माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. आडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत आहेत आणि त्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करताना दिसत आहे. कायदा सर्वांना लागून होतो, मग पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक. जर हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी कारवाई केली नसती तर निवडणूक आयोग आणि पंतप्रधानमंत्री यांच्यावर होणारी टीका थांबली असती. मात्र, असे झाले नाही, दोघांवरही टीका होत आहे, असे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी सांगितले आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी मनसेेचे उमेदवार नसला तरी, राज ठाकरे यांची आज पुण्यात ....
अधिक वाचा