By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 05:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी रस्त्यावर काम करणार्या कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ १ महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात काम चालू असल्याच समजताच ‘वर्क ऑर्डर कुठे आहे?’ असा प्रश्न विचारताना मारहाण करत आहेत.
कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी ४ कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते. व त्याच ठिकाणी नगरसेवक (प्रभाग क्रमांक ७०) कप्तान मालिक यांनी कामगारांकडे कामाची विचारणा केली असताना मालिक यांनी कामगारांना मारहाण केली.
तसेच तो खासगी ठेकेदार होता. तो महानगपालिकेचे नुकसान करत होता. त्याला एक दिवस आधीपण मी समजवलं होतं. त्यांना विनंती करून काम थांबवण्यास सांगितलं. त्यादिवशी त्यांनी काम बंद केल. मात्र, दुसर्याे दिवशी पुन्हा काम केलं. मला पुन्हा काम करताना दिसले.
ते दादागिरीने काम करत होते. ती दादागिरी थांबण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं.” मी मारहाण केली आहे. त्या व्हीडिओत देखील मी सांगितलं आहे की मी काही चुकीचं केलं असल्यास माझ्या विरुद्ध पोलिस तक्रार करा. असं नगरसेवक कप्तान मालिक यांनी एका माध्यमाशी बोलताना संगितले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ महिनाभरापूर्वीचा असला तरी कामगारांना शिवीगाळ किंवा मारहाण करणे कितपत योग्य आहे तसेच इथे तर कायदा हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आपल्या नगरसेवक भावावर कारवाई करणार क्कक असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे - 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ....
अधिक वाचा