By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 04:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : गडचिरोली
आज दि. २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या पाहिल्याच दिवशी गडचिरोलीतील पुरसळगोंदी येथील पोलिस पाटील मारू पुंगाटी व राष्ट्रवादी-कोंग्रेसचे कार्यकर्ते ऋषि मेश्राम यांची नक्षलवाद्यांनी निर्घुण हत्या केली. तर दुसरीकडे कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्याची व शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांच्या कायम विरोध राहिला आहे. तरीही शासन व प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. या उत्खननाला पोलिस पाटील पुंगाटि व राष्ट्रवादी कार्यकर्ते मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरिबांना फक्त १० रुप....
अधिक वाचा