ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आमदारांनी चिंता नको, पुन्हा निवडणुका होणार नाहीत', शरद पवारांचं वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'आमदारांनी चिंता नको, पुन्हा निवडणुका होणार नाहीत', शरद पवारांचं वक्तव्य

शहर : मुंबई

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा तर झालीच शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

'आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथं जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत,' अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांना केल्या आहेत.

महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत भाष्य केल्याची माहिती आहे. 'आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नाही,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपसमोर सत्तावाटप करताना शिवसेनेनं 50-50 चा फॉर्म्युला ठेवला होता. आता तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या मागणीला शिवसेना कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शिवसेनेपेक्षा आमचे केवळ दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा आमचा दावा चुकीचा नाही,' असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

मागे

भाजप मध्यवर्ती निवडणुकांच्या तयारीत ?
भाजप मध्यवर्ती निवडणुकांच्या तयारीत ?

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना ,राष्ट्रवादी, कॉंग्र....

अधिक वाचा

पुढे  

झारखंडमध्ये भाजपला धक्का, लोजप स्वबळावर लढणार
झारखंडमध्ये भाजपला धक्का, लोजप स्वबळावर लढणार

महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेसाठीचा घोळ पाहून झारखंडमध्ये लोक जनशक्ती....

Read more