ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 13, 2024 07:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 ‘मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

शहर : मुंबई

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण आलेलं नाही. शरद पवार यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्येत श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. या मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण फार मोजक्या लोकांना दिलं जात आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पण तरीही भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण अद्याप आलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. तर शरद पवार यांनादेखील अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही. शरद पवार यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलाय.

शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. “अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहेय मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असं शरद पवार म्हणाले.

अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ

अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. 10 हजारांचे तिकीट 40 हजार रुपये करण्यात आले आहे. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील, असं शरद पवार म्हणाले. “राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचे काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील, असं शरद पवार म्हणाले.

‘मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर…’

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आहे, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असं शरद पवार म्हणाले.

 

पुढे  

माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षाचं नातं संपवत आहे… हाती भगवा घेताच मिलिंद देवरा भावूक
माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षाचं नातं संपवत आहे… हाती भगवा घेताच मिलिंद देवरा भावूक

केंद्र आणि राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भार....

Read more