ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शपथविधीत शरद पवार यांना खरंच पाचव्या रांगेत स्थान ?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शपथविधीत शरद पवार यांना खरंच पाचव्या रांगेत स्थान ?

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी 30 मेच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि देशभरात चर्चेचा विषय झाला. या भव्य सोहळ्यात देश-विदेशातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या कार्यालयातून त्यांना चुकीची माहीती दिली गेली. प्रत्यक्षात पवारांना मिळालेली जागा ही पहिल्याच रांगेतील होती हे समोर येत आहे. पाचव्या रांगेत स्थान दिले म्हणून शरद पवार नाराज असल्याचे सांगितले गेले. पण आता यामागचे वेगळेच कारण समोर आले आहे. शरद पवार यांना V रांगेतील पास दिला होता. परंतु V रांगेतील पास पाचव्या रांगेत असल्याची चुकीची माहिती पोहोचवली गेली. शरद पवार यांच्याच कार्यालयातून ही चुकीची माहिती पवारांना दिली गेली. त्यामुळे पवारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला. पण प्रत्यक्षात V रांग ही सर्वात पुढे होती. हा V म्हणजे रोमन पाच अंक असल्याचा समज झाला. आणि पाचवी रांग दिली गेल्याची माहीती पवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

मागे

आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी - प्रकाश आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी - प्रकाश आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यास....

अधिक वाचा

पुढे  

प्रकाश मेहता यांचे पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रीपद जाणार ?
प्रकाश मेहता यांचे पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रीपद जाणार ?

येत्या १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुंबईतील ताडदेव ....

Read more