ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यपालांच्या 'त्या' पत्रावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2020 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यपालांच्या 'त्या' पत्रावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले....

शहर : tuljapur

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहित राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या पत्रातून त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यपालांच्या पत्रातील संदर्भ अनुसरून राज्यपालांनी मुखमंत्री पदाची आब ठेवायला हवी असा आग्रही सूर पवारांनी आळवला. गृहमंत्र्यांनी त्यांची कान उघडणी केली हे अगदी योग्यच, असं म्हणत पुढं आता त्यांनी पदावर राहावं की नाही त्यांनी ठरवावं असा टोला त्यांनी लगावला. राज्यपालांनी पदाची किंमत ठेवावी आता त्यांनी ठरवलं पदाची किंमत ठेवायची नाही तर आम्ही काय करावे, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज्यपालांनी पत्रात नेमकं काय लिहिलं होतं?

ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली होती. बार, रेस्तराँ आणि समुद्रकिनारे खुले होतात. पण, दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे, असा उपरोधिक टोला राज्यपालांनी लगावला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा संघर्षानं पुन्हा डोकं वर काढलं होतं.

 

 

मागे

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर
नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर

परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार तडाखा....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

“केंद्र सरकार निश्चित मदत करेल. यापूर्वीचे यूपीएच्या सरकारपेक्षा केंद्र ....

Read more