By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत जागा देण्यात आली होती. यावर शरद पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या नाराजीमुळे शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आणि स्वतंत्र खात्याचे मंत्री शपथ घेतली. टीम मोदीमध्ये एकूण ५७ मंत्री असणार आहेत. या सगळ्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. मोदी सरक....
अधिक वाचा