ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रम टाळावे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 21, 2020 06:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रम टाळावे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना

शहर : मुंबई

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. यावरुन राजकारण रंगण्याची चिन्हे आधीपासूनच दिसू लागली आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखाने धार्मिक कार्यक्रमांना जाणे टाळावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित आहेत. ते आपल्या वैयक्तिक क्षमतेत कोविड19 संबंधी निर्बंधांचे पालन करुन सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. मात्र धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यांना चालना देणे टाळावे” असे ट्वीट माजिद मेमन यांनी केले.

माजिद मेमन यांचे मत राष्ट्रवादीशी जोडले गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. “माझे ट्वीट हे माझे वैयक्तिक मत आहे, मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मत असेलच असे नाही. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत माझा सल्ला विचारला नाही आणि त्यांनी काय करावे, याबद्दल मी सांगण्याची स्थिती नाही” असे मेमन यांनी लिहिले.

राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

 

मागे

ठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा
ठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे  ठाकरे सरकार सपश....

अधिक वाचा

पुढे  

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील
माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

“कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा दे....

Read more