By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
येत्या हफ्ताभरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारांची चाचपणी करणे मतदारांचा अंदाज घेऊन उमेदवार घोषित करण्याची लगबग दिसून येत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर अनेक पक्षांची आमदार खासदारांची गळती आणि भरतीची कामेही जोरात चालू आहेत. ह्याच गळतीमुळे हैराण झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली पहिली यादी बीड मधील मतदार संघासाठी जाहीर केली आहे.
अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीडमधून बोलताना ही नावे जाहीर केली आहेत. यावेळी धनंजय मुंडे उपस्थित होते. बीड मधील उमेदवार जाहीर करतानाच आष्टी मतदारसंघाचा उमेदवार लवकरच घोषित करु असे शरद पवार यांनी सांगितले.
मतदारसंघानुसार उमेदवार :
परळी : धनंजय मुंडे
गेवराई : विजयसिंह पंडित
केज : नमिता मुंदडा
बीड : संदीप क्षीरसागर
मजलगाव : प्रकाश सोळंके
परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याने बीड मध्ये पुन्हा भाऊ बहीण आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे परळी मतदारसंघाची निवडणूक चुरशीची आणि विशेष प्रतिष्ठेची होणार हे नक्की. मागील निवडणुकीत धनंजय मुंडे पराभूत झाले होते.
तीर्थक्षेत्र आणि इतर स्थळांच्या विकासासाठी चालू वित्तीय वर्षात 298 कोटी 40 ....
अधिक वाचा