ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना निरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवारांचा आमदारांकरवी शरद पवारांना निरोप

शहर : मुंबई

राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे 3 दिग्गज नेते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. अजित पवार यांची परत घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवार हे थांबलेल्या ब्राइटन इमारत इथं गेले. यावेळी सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आमदारांच्या मार्फत शरद पवारांना एक निरोप पाठवल्याची माहिती आहे.

'राष्ट्रवादीत फूट पडून द्यायची नसेल तर पक्षाने भाजपला पाठिंबा द्यावा,' असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पाठवल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांना यश आलं नसल्याचं दिसत आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंड करत भाजपला पाठिंबा दिला. या पाठिंबाच्या जोरावर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र आता या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. कारण राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे परत राष्ट्रवादीत परतले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण या नेत्यांच्या पाठिंब्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

धनंजय मुंडेही होते गायब

राज्यात सत्ता स्थापनेच्या हाय होल्टेज ड्राम्याला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार हजर होते. या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं ठरलं होतं. ही बैठक संपल्यानंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी आपले मोबाईल फोन बंद केले.

त्यानंतर मध्यरात्री जवळपास 12-1 वाजेच्या दरम्यान, समर्थक आमदारांना फोन करण्यात आले होते. या सर्व आमदारांना सकाळीच 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या घरी येण्याची सूचना करण्यात आली. हे सर्व आमदार मुंडेंच्या घरी पोहोचल्यानंतर सकाळी 7.30 वाजता अजित पवार आणि सर्व समर्थक आमदार हे राजभवनावर पोहोचले. त्यानंतर राजभवनावरच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

 

 

मागे

...तर देवेंद्र फडणवीस,अजित पवार  यांना द्यावा लागेल राजीनामा
...तर देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांना द्यावा लागेल राजीनामा

राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप आला. राज्यपाल भगतसिंग कोश्य....

अधिक वाचा

पुढे  

पापी अजित पवार नजरेला नजर मिळवत नव्हते, काळोखातील पाप काळोखात नष्ट होईल : संजय राऊत
पापी अजित पवार नजरेला नजर मिळवत नव्हते, काळोखातील पाप काळोखात नष्ट होईल : संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी म....

Read more