ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवार ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवार ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल'

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाविकासआघाडीच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या दिवशी मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले मात्र, ते त्यांची नाराजी कायम आहे. अजित पवार हे ऐन शपथविधीच्या दिवशी 'नॉट रिचेबल' असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाराज दादांची ताईंकडून पुन्हा मनधरणी..

खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अजित पवारांशी बातचित केली. अजित पवार सायंकाळी 5 वाजता सिल्व्हर ओकवर येणार आहेत. तसेच सायंकाळी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शपथविधीला मी आणि दादा सोबत येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. मात्र, दादा नेमके कुठे आहेत हे कोणालाही माहीत नाही.

उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटलांचे नाव आघाडीवर..

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत निश्चित झाले आहे. या पदासाठी जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यापूर्वी बुधवारी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. महाविकासआघाडीच्या खातेवाटपामध्ये उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे असणार आहे. तर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असणार, अशी महत्त्वाची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिली.

मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाचे नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे. 5 वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच असणार आहे. तर विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्येक पक्षाचा एक किंवा दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार हा 3 डिसेंबर अर्थात विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर होणार आहे, असंही पटेल यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्रिपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, एकच उपमुख्यमंत्री असणार आहे आणि तो राष्ट्रवादीचाच असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

मागे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक - आदेश बांदेकर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक - आदेश बांदेकर

“केंद्रानेसुद्धा महाराष्ट्राने पाठवलेल्या फाईल्स या तातडीने मंजूर करुन....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार

ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष रा....

Read more