ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, 'त्या'दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 09:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, 'त्या'दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे

शहर : मुंबई

 राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी बंडखोरी करत भाजपला समर्थन देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदारहीसोबत होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचाही यामध्ये समावेश होता, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं मुंडेंनी सांगितले.

मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. त्यादिवशी घटना घडली तेव्हा मी एक वाजेपर्यंत झोपलेला होतो. मला याबद्दल काही माहित नव्हते. त्यामुळे मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

निवडणूक सगळ्यांनी एकत्र लढवली. पण त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे अजित पवार यांच्यावर प्रेम ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी घेतलेल्या निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”, असंही मुंडेंनी सांगितले.

मुंडे म्हणाले, “माझ्या बंगल्यावर काय झाले हे मला माहित नाही, तो सार्वजनिक आहे. मला याबद्दल काही माहित नव्हते. माध्यमांनी लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत

दरम्यान, ग्रँड हयातमध्ये आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मागे

अजितदादा सरकारमध्ये आले म्हणून फाईल बंद, जनसामान्यांचा विश्वास उडाला – खडसे
अजितदादा सरकारमध्ये आले म्हणून फाईल बंद, जनसामान्यांचा विश्वास उडाला – खडसे

अजित पवार उपमुख्यमंत्री होणं, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणं आणि बातमी येणं....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!
काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!

राजकीय घडामोडींमुळे सध्या राज्यात वातावरण ढवळून निघालं आहे. अशात शिवसेना, ....

Read more