ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला

शहर : मुंबई

आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.

आजच जयंत पाटील यांचा शपथविधी  होणार आहे. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. यासाठी सुरुवातीपासूनच अजित पवारांचे नाव चर्चेत होते. मात्र अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे ते बॅकफूटवर गेले आणि त्यांच्या जागी आता जयंत पाटलांची वर्णी लागली आहे. आता अजित पवारांकडे कोणती जबाबदारी पडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाराष्ट्र विकासआघाडीच्या तिन्ही पक्षांकडून शिक्कामोर्तब झाले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा घोळ कायम होता. उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट करण्यात आले होते. तरी हा उपमुख्यमंत्री कोण असेल, हे कोडे मात्र अद्याप सुटलेले नव्हते. रात्री ते कोडे सुटले.

उपमुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे उत्सुकता कायम होती. अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होता. रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून हे नाव निश्चित होईल, असे सांगितले जात होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे स्पष्ट केले.

मागे

२४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद,शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
२४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद,शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा

बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींना गुरूवारी एक वेगळं वळण ....

अधिक वाचा

पुढे  

आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय -   सुप्रिया सुळे
आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय - सुप्रिया सुळे

बुधवारी विधानभवनात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी विधानभवनात खऱ....

Read more